बोलता बोलता नकळत
दोन क्षण थांबतो
तेवढंच असतं आयुष्य काही नात्यांचं
साचून राहिलेला पाऊस बरसून गेला
कि हवा कुंद होते
तसंच होतं आपलं
एक एक पड सुटे होत गेले
कि गाभा सापडतो
तसेच गवसतो मग आपण स्वतःला
सोनसळी स्वत्वाच्या आभेने
झळाळून उठतं आपलं आभाळ
----- वैभवी भिडे
दोन क्षण थांबतो
तेवढंच असतं आयुष्य काही नात्यांचं
साचून राहिलेला पाऊस बरसून गेला
कि हवा कुंद होते
तसंच होतं आपलं
एक एक पड सुटे होत गेले
कि गाभा सापडतो
तसेच गवसतो मग आपण स्वतःला
सोनसळी स्वत्वाच्या आभेने
झळाळून उठतं आपलं आभाळ
----- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment