इथेच कुठेतरी असशील तू सांडलेला
नजरेला माझ्या पारखा झालेला
दिशांचा माझा अंदाज कठीणच
अन तू हट्टाला पेटलेला
चाचपडत अंदाज घेतेय
एकेक कण वेगळा करत
आशेच्या या कसोटीवर
तू सुटून मोकळा झालेला
अलगद वेचत जाते मी
त्या निसर्ग मालिकेला
ओंजळीत जपून आणावं
तर तू उंबऱ्याशी थांबलेला
---- वैभवी भिडे
नजरेला माझ्या पारखा झालेला
दिशांचा माझा अंदाज कठीणच
अन तू हट्टाला पेटलेला
चाचपडत अंदाज घेतेय
एकेक कण वेगळा करत
आशेच्या या कसोटीवर
तू सुटून मोकळा झालेला
अलगद वेचत जाते मी
त्या निसर्ग मालिकेला
ओंजळीत जपून आणावं
तर तू उंबऱ्याशी थांबलेला
---- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment