कुणीतरी सांगा या आभाळाला
असं सकाळी सकाळी मळभ पांघरून बसू नये
उगाचच मग उदास बिदास वाटतं
पार तळाचं काहीबाही आठवतं
आसपासचं दिसेनासं होऊन
भलतंच विश्वं दिसू लागतं
कोशात असल्यासारखं
उन्हाची तिरीप यायलाही जागा उरत नाही
ना उबदार ना थंडगार
मन पुरतं कोरडं
जाणिवा उसवल्या सारखं
ना सुई ची मदत ना दोऱ्याची सोबत
सगळे पुढे जात असतानाही
आपण कुठेतरी मागे अडकलेलो
माहित असतं बेभानपणा गमावून बसलोय
फार पूर्वीच
तरी आठवणींना उगाच चुचकारतो
भानावर येताना दिसतात
सगळ्या रेषा आपापल्या मूळ जागी
मग आभाळाकडे नजर व्यक्त करते अपेक्षा
पुन्हा असं भरून न येण्याची
----- वैभवी भिडे
असं सकाळी सकाळी मळभ पांघरून बसू नये
उगाचच मग उदास बिदास वाटतं
पार तळाचं काहीबाही आठवतं
आसपासचं दिसेनासं होऊन
भलतंच विश्वं दिसू लागतं
कोशात असल्यासारखं
उन्हाची तिरीप यायलाही जागा उरत नाही
ना उबदार ना थंडगार
मन पुरतं कोरडं
जाणिवा उसवल्या सारखं
ना सुई ची मदत ना दोऱ्याची सोबत
सगळे पुढे जात असतानाही
आपण कुठेतरी मागे अडकलेलो
माहित असतं बेभानपणा गमावून बसलोय
फार पूर्वीच
तरी आठवणींना उगाच चुचकारतो
भानावर येताना दिसतात
सगळ्या रेषा आपापल्या मूळ जागी
मग आभाळाकडे नजर व्यक्त करते अपेक्षा
पुन्हा असं भरून न येण्याची
----- वैभवी भिडे
No comments:
Post a Comment