Tuesday, June 17, 2014

माझ्याकडे बरचसं नाहिये 
हे मला जगामुळे कळलं 
सगळं अपूर्ण आहे 
असं मला कळविण्यात आलय 

नुसतीच समजुतींची गर्दी 
बिननावाची बिनचेहऱ्याची 
आणि हो बिनबुडाची सुद्धा 

आपापल्या परीने प्रयत्न सुरु असतात 
इतरांना अपंग ठरविण्याचे 
स्वतःची पांगळी मने नजरे आड करत 

पण मी म्हणते का हा अट्टाहास 
दुसऱ्याची रेषा आखूड ठरविण्याचा ?

हे सगळं असंच चालू रहाणार 
माणसाचं जनावर होई पर्यंत 
मग आपसूकच सगळं ठीक होईल 
जंगलाचा कायदा लागू झाला की  

---- वैभवी भिडे

No comments:

Post a Comment