Tuesday, June 17, 2014

माझ्याकडे बरचसं नाहिये 
हे मला जगामुळे कळलं 
सगळं अपूर्ण आहे 
असं मला कळविण्यात आलय 

नुसतीच समजुतींची गर्दी 
बिननावाची बिनचेहऱ्याची 
आणि हो बिनबुडाची सुद्धा 

आपापल्या परीने प्रयत्न सुरु असतात 
इतरांना अपंग ठरविण्याचे 
स्वतःची पांगळी मने नजरे आड करत 

पण मी म्हणते का हा अट्टाहास 
दुसऱ्याची रेषा आखूड ठरविण्याचा ?

हे सगळं असंच चालू रहाणार 
माणसाचं जनावर होई पर्यंत 
मग आपसूकच सगळं ठीक होईल 
जंगलाचा कायदा लागू झाला की  

---- वैभवी भिडे
कौतुक वाटतं मला तुझं 
इतकं सरळ मार्गी हिशोब करणं 
तुलाच फक्त कसं जमतं ?? 

इथे जो तो तुझं माझं 
करण्यात गुंतलेला 
अन तू मात्र 
स्वार्थपरायणात गुंतलेला 
वर्ण लिंग वय भेदांपलीकडे 

जेव्हा ज्याची वेळ येते 
त्याला तू सोबत नेतोस 
बाकी कोणाकडे ढुंकूनही न पहाता 
एकाग्रतेचा गुरु जणू 

कुठलं घडयाळ आहे रे तुझ्याकडे 
माणसाची अचूक वेळ दाखवणारं??

बरं इतकं करूनही 
तू सगळ्यांचा नावडताच 
अचूक नेम साधूनही 
तुझा सत्कार अपशब्दानीच 

तुझ्यावर अन्यायीपणाचा शिक्का  
जगाने बहुमताने मारलाय 
तुझ्या कर्तव्यनिष्ठतेकडे काणाडोळा करत 

पण मी खूप भारावून गेलेय 
अगदी सुरुवातीला तुझी चुणूक पाहीली ना तेव्हापासून 
अचानक शिरकाव केलेलास तू माझ्या आयुष्यात 
आणि मग घरचाच झालास 
येत राहिलास वरचेवर 

खरंतर मला फारसं कळत नाही 
आयुष्यं नावाच्या विषयातलं 
पण तरी तुझं सच्चेपण जाणवतं 
बाकी कोणी काहीही म्हणो 
मला मात्र तुझी बाजू पटलीये 

बाकी सविस्तर बोलूच 
आपली "प्रत्यक्ष" भेट होईल तेव्हा 

---- वैभवी भिडे
छुटकारा देदो मुझे अब  
इन बेबस, लाचार गलियोसे 
जिनकी हर राह मुडती ही नाकामायाबी कि तरफ 
मुझे नही बनना उनका इक हिस्सा 

मेरे कदम बार बार रुख कर रहे हैं 
पूरब की और 
वोही तो है मेरा देस शहर और घर 
उसकी  कच्ची दीवारोसे भी 
हौसले की महक आती है 
मिट्टी के  रोम रोम में भरा है साहस 
इससे कुछ भी बनाव 
दिया घडा या फिर मूरत 
कच्चा न रहेगा 
असली सिक्का है 
कामयाबी की सुरत ऐसीही होती है 

देर सवेर सही मैं पोहोचुंगी जरूर वहा 

----- वैभवी भिडे
हे असं मुक्त उधळणं बरं न्हवे  
तोल जायची भीती असते म्हणे 
मला नाही बुवा असं वाटत 
का असं स्वतःच्याच कैदेत कोंडून राहायचं 

पाऊस का कधी असा ठरवून येतो 
पाच थेंब पडून परत आभाळात जातो? 
तो येतो वाऱ्याशी ,ढगाशी दंगामस्ती करत 
विजेलाही नाही कधी एकटा सोडत 
मातीला तरी कुठे स्वस्थ बसवतं 
गंधाचा वेड मग तिच्यातूनही उफाळतं 
बेभानातेचा उत्सव असा जग साजरा करतं 
गुपचूप चौकटीचं दार किलकिलं उघडतं 
किल्लीबरोबर कुलूपही  वाहून जातं 
अरेच्या हे कसलं आक्रीत घडतं 
मुक्ततेचं गीत माझं सारं जग गुणगुणतं 

----- वैभवी भिडे
कल का पता नही 
हम आज हैं 
कलम कागज है 
और हमारे कुछ खयाल 
साथ मिल जाए जब ये तीन यार 
तो क्या कहने 
हर दिन नया सुरज हर रात नया चांद हैं 
पर ये आज है दोस्तो 
कल शायद होगी  अलग यारो की महफिले 
उन्ही आईनोमे हम देख लेंगे अपना अक्स 
बदल हुआ 
---- वैभवी भिडे
उफ ये रातोकी नींद 
कितनी देरतक रहती है 
एक हम है 
जिससे इंतजार नही होता 
और एक ये सुबह है 
जो जलदी नही आती 
कितनी देर सजसवरने में लगाती है 
कोई उसे बताओ जादा धूप अच्छी नही 
थोडी औस की बुंदे पहना करो 
अलग नूर आ जाएगा 
हम भी उस "अलग" की तलाश में हैं 
पर वो है की पर्दानशीन होकर छुपा है 
लेकिन इस बात से बेखबर 
सुबह के आतेही नींद खुल जाएगी 
और धुंदला आसमान साफ नजर आएगा 
बस ये रात कब जगेगी 
हम से और इंतजार नही होता

---- वैभवी भिडे
ही शब्द अन गीतातील दरी ओलांडायला 
लयीची वाट सापडायला हवी 
हे कळतंय मला 
पण काय करू                                                    
माझी कूस जन्माला घालतेय 
नवी रागदारी 
आहे कोणी तयार                                              
 हीला आपल्या गळ्यातून  मानवंदना द्यायला ??? 

---- वैभवी भिडे
अजून खूप काही बघायचं बाकी आहे 
अशी कितीशी वर्षं झाली मला 
या पृथ्वी ग्रहावर येउन 
किती करोडो मैल विस्तारलेल्या 
क्षेत्रफळाला अजून माझा पदस्पर्श झालाच नाहीये 

वेगवेगळ्या जंगलांचे रंग डोळ्यांना टिपायचेत 
वन्य जीवांच्या चलत चित्रांसहित 
हरखून जाणे या म्हणीचा जिवंत प्रत्यय अनुभवायचाय 

पाण्याचा रंगही वेगळा असतो म्हणे 
ज्यात मिसळले असेल तसा 
नजर आणि मन निवेल त्याची विविध रूपं बघून 

सूर्य म्हणे कुठे लवकर कुठे नंतर दिसतो 
मला बघायचा आहे वेगवेगळ्या वेळांचा उदय अस्त 
त्याबरोबर बदलणारा आकाश 
एकेक तर उगवताना न्याहाळायचयं 

कित्ती कित्ती बाकी आहे अजून 
अगदी माझ्या शेजारचं गावही 
तिथे म्हणे वारा सुगंधी वहातो 
इतका निर्मळ की नजरही स्वच्छ व्हावी 
माझ्या मनाला टवटवीत करायचय 

पण पण मी पोचेस्तोवर उरलं असेल का हे निसर्गचित्र जसच्या तसं ???????????

----- वैभवी भिडे
कपाळा वरच्या गोंदणा प्रमाणे 
ठसून जातात सल हृदयात  
ठसठशीत ठळक                                                                           
मनाचे एक एक स्तर पार करत 
आत खोलवर दडून बसतात 
मौका साधून टोचणी द्यायला 

फार क्रूर असतात हे सल 
अफाट ताकदीचे 
एका क्षणात भूकंप आणतात 
ध्वस्त करतात मंदिर, मस्जिद, चर्च 
विना भेदभाव 

आरोग्यास अतिशय हानिकारक 
असाध्य रोगाहूनही भयानक 
आजवर औषधाचा शोध लागला नाही 
आणि भविष्यात लागण्याची चिन्हेही नाहीत 

दुर्मिळातील दुर्मिळ खटला 
फिर्यादी अन आरोपी आपलंच मन
निकाल मात्र अनिश्चित कालावधी साठी 
पुढे ढकलण्यात आलेला 

----- वैभवी भिडे